करमाळासोलापूर जिल्हा

49 ग्रामपंचायती मध्ये शिंदे ,जगताप, बागल, पाटील , कांबळे हे पाच गट लढतायत आमने-सामने

प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा तालुक्यातील लागलेल्या 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरीता आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 540 जणांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने आता या निवडणुकीच्या आखाड्यात 861 उमेदवार आपले नशिब अजमावणार आहेत. तर तालुक्यात आता शेतकरी कामगार संघटनेचा पाचवा गटही आपली ताकद आजमावणार आहे. त्यामुळे पाटील, बागल, शिंदे, जगताप यासह कांबळे हे ही मैदानात आहेत.

करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायत पैकी जेऊरवाडी, सालसे दोन ग्रामपंचायत बिनविरोध निघाले आहेत. 49 ग्रामपंचायत मध्ये 861 उमेदवार आमने-सामने लढत आहेत. यामध्ये गावपातळीवरील आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जरी होत असली तरी यामध्ये संजय मामा शिंदे गट, जगताप गट, बागल गट बरेचशा ठिकाणी एकत्र लढत आहेत. तर नारायण आबा पाटील, बागल गट व दशरथआण्णा कांबळे गट लढत आहेत. शिंदे गट जगताप गट बागल गट 49 ग्रामपंचायती लढवत आहेत. तर कांबळे गट 38 ठिकाणी लढत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. यामुळे आता प्रत्येक गावची लढत रंगतदार होणार व पाच गटामुळे चुरस वाढणार मतांची विभागणी होणार हे निश्चित आहे.

तर पांडे1, दिलमेश्वर1, कुगांव7, बिटरगाव2, पार्थुडी1, सालसे 9, नेरले 2, रोशेवाडी2, पोटेगाव5, मांगी1, गुळसडी1, सरपडोह5, आळसुंदे 2, जेऊरवाडी 7 एकुण 46 जण बिनविरोध झाले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE