करमाळासोलापूर जिल्हा

कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी 66 . 61 लाख निधीची तरतूद

करमाळा समाचार 

करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रम 2020 -21 अंतर्गत मतदार संघातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय करमाळा व ग्रामीण रुग्णालय जेऊर यांच्यासाठी covid-19 प्रादुर्भाव रोखण्याकरिता वैद्यकीय उपकरणे व साधन सामग्री खरेदी करण्यासाठी 66. 61 लाख रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की ,या निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र केम , कोर्टी ,वरकुटे ,साडे ,पिंपळनेर व रोपळे( क) या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये 6. 47 लाख रुपये किमतीची साहित्य खरेदी केली जाणार आहे .यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर -2 ,ऑक्सीजन जंबो सिलेंडर -5 , ऑक्सिजन रेगुलेटर -2 , ऑक्सिजन सेंट्रल सिस्टीम – 6 अशी साधनसामग्री खरेदी केली जाणार आहे .एकूण 6 उपकेंद्रासाठी प्रत्येकी 6.47 लाख याप्रमाणे एकूण 38. 82 लाख रुपयांची तरतूद प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केलेली आहे .

उपजिल्हा रुग्णालय ,करमाळा व ग्रामीण रुग्णालय ,जेऊर या दोन्ही ठिकाणी जवळपास 36 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात येणार आहेत त्यासाठी 27 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच इतर सामग्रीसाठी 79 हजार रुपयांची तरतूद आहे केली आहे .एकूण करमाळा व जेऊर या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठी 27.79 लाख , तसेच 6 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 38..82 लाख अशी एकूण मतदारसंघासाठी 66 . 61 लाख रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

ads

ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा मिळण्याचा प्रश्न आहे. कोरोना रुग्णांना ग्रामीण भागांमध्येही ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE