जलतरण स्पर्धेत 85 स्पर्धक ; हरनवर , जाधव , तळेकर विजयी
करमाळा समाचार –
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण स्पर्धा संपन्न झाली. यावेळी मा.मिठु जगदाळे API करमाळा पोलीस स्टेशन, मा.रघुनाथ शिंदे उप अभियंता महावितरण करमाळा, मा.गणेश करे -पाटील यशकल्याणी सेवा भावी संस्था संस्थापक अध्यक्ष, मा.संजय मोरे सर, मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा यांच्या हस्ते धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरवात झाली.

या स्पर्धेत 85 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील तीन गट बाल , लहान,मोठा असे होते त्यामध्ये प्रत्येक गटात तीन विजेते निवडले त्यांना रोख रक्कम , मेडल , व ट्रॉफी मोठागट 5000/_, 3000,/_ 2000/_ लहान गट 3000,/_2000,/_1000/_बालगट 2500,1500, 1000/_ बक्षिस विजेत्यास देण्यात आले.

बालगट विजेते
1) मयुरेश हरनवळ
2) सोहम घोगरे
3) मेघराज गावडे
उत्तेजनार्थ (श्रुती शिंगाडे)
लहान गट विजेते
1) साईराज जाधव
2) प्रथमेश शिंगाडे
3) अमिनेश निमकर ,
उत्तेजनार्थ (संस्कृती रणशिंग )
मोठा गट विजेते
1) अदित्य तळेकर
2) प्रतिक केकान
3) सुयोग मोरे यांनी जलतरण स्पर्धेत आज बाजी मारली.
यावेळी मान्यवर मा.शंकर भोसले साहेब, मा.डाॅ.अमोल दुरंदे , मा.गणेश जाधव बार्शी, मा.अशोक गोफणे, मा.सचिन कणसे, मा.चोपडे गुरूजी, मा.बाबा घोडके, मा. शहाजी ठोसर, मा.सुशिल नरूटे, मा.दिपक थोरबोले, मा.करण आलाट, मा.खाडे गुरूजी, मा.डाॅ.अमोल मोटे, मा.शशिकांत पवार, मा.सचिन अडसुळ, मा.दिग्विजय घोलप, मा.सागर आलाट, मा.श्रीराम जाटे सर, मा.कोरे, मा.ओंकार गबाले, मा.भैय्या पदमाळे, मा.ननवरे मेजर, मा.ननवरे, मा.पंकज थोलबोले व मनसैनिक उपस्थित.