करमाळाकृषीताज्या घडामोडीराजकीयसहकारसाखरउद्योगसोलापूर जिल्हासोलापूर शहर

आ. रोहित पवार व सहकाऱ्यांचा धसका ? – आदिनाथमध्ये मागच्या दाराने एंट्रीमुळे चर्चाना उधान

करमाळा समाचार

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर दोन जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते देण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व पांगरे येथील संजय गुटाळ यांचा समावेश आहे. सदरची निवडीत मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांचा वरदहस्त असल्याचे दिसुन येत आहे. पण निवडाणुकांना सामोरे जाण्यापेक्षा मागच्या दाराने सावंत हे सत्ता घेऊ पहात असल्याचे यातुन दिसुन येते. त्याअर्थी निवडणुकात पराभवाची भिती हे प्रशासक आणण्यामागचे कारण आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद होता आर्थीक अडचण होती त्यावेळी पुढाकार घेऊन तानाजी सावंत यांनी कारखान्याला सहकार्य केले. त्यामध्ये मोलाचे असे आर्थीक सहकार्य झाल्याने कारखान्याचा बंद पडलेला कारखाना सुरु तरी होऊ शकला आहे. पण कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने तिथे निवडणुका घेणे अपेक्षीत होते. पण निवडणुका घेतल्यातर विरोधी गटात असलेले आ. रोहित पवार (rohit pawar), आ. संजयमामा शिंदे (sanjaymama shinde), माजी आमदार जयवंतराव जगताप (jayavantrao jagtap) व बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे (subhash gulave) हे विरोधात उभे राहणार हे नक्की होते.

त्याशिवाय बागल गट व पाटील गटाचे मनोमिलन होताना दिसत नव्हते. अशा परिस्थितीत निवडणुका लागल्या असत्या तर पवार व शिंदेंचे पारडे जड होऊ शकते त्यामुळे त्याच भितीने कारखान्यावर प्रशासक आणुन त्यात आपल्या विश्वासातील लोकांचा समावेश करुन कारभार चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसुन येत आहे.

मागील महिनाभरापासून प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यानंतर कारखान्याची काहीच हालचाल सुरू नव्हती. तर येणारा हंगाम लक्षात घेता यावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले. जेणेकरुन कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत व्हावा अशी अपेक्षा आहे. पण पुन्हा विषय तिथेच येऊन थांबतो. कारखान्याला आर्थीक मदत कोण करणार ? सरकार करेल की पुन्हा तानाजी सावंत हेच करतील ? त्यामुळे या हंगामात कारखाना सुरु होईल का व चालेल का हा प्रश्न आहे.

एक प्रकारे प्रशासक आल्यानंतर निवडणुकात वेळ घालवण्याची गरज पडणार नाही. निवडणुका घेतल्या तर वेळही जाऊ शकतो मग हंगाम कसा सुरु होईल. यंदाचा हंगाम सुरळीत पार पाडायचा असेल तर आता पासुनच कामाला लागावे लागणार आहे.

नियुक्त करण्यात आलेले अशासकीय संचालकांच्या माध्यमातून कारखान्याला लाभ होणे अपेक्षीत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ तर पांगरे येथील संजय गुटाळ हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात. तसेच आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येणारा गळीत हंगाम यशस्वी पार पाडणार असल्याचे चिवटे यांनी जाहीर केले आहे. तर दोन्ही सदस्यांच्या माध्यमातून जर शासकीय किंवा खाजगी निधी उपलब्ध होऊ शकला तर कारखाना सुरु करण्यात काहीच अडचण येणार नाही. पण शासनाने जर अंग काढुन घेतले तर नियुक्त संचालक मंडळासह कारखान्याच्या अडचणीत वाढ होईल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE