निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची ९६ लाखांची फसवणुक ; भाऊ वडीलांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
पोलीस दलातुन सहा, पोलीस आयुक्त या पदावरून सेवा निवृत्त असलेल्या मालोजी माधवराव पाटील वय 59 वर्ष, रा.ए 601,द गेट वे को.ऑ.हौसिंग सोसायटी,बालेवाडी पुणे-45, मुळ गाव – केत्तुर नं 02 यांची कुटुंबातील व नातेवाईक मंडळींनी फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार केली आहे. मालोजी पाटील यांची ९६ लाख ३९ हजाराची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत म्हणटले आहे.

याप्रकरणी 1) लखोजी माधवराव खाटमोडे,2) माधवराव तुळशीराम खाटमोडे , 3) राणी लखोजी खाटमोडे तिघे रा केत्तुर नं 2 ता करमाळा जि सोलापूर तसेच 4) सुनिल माणिकराव नलवडे 5) सौ मिरा सुनिल नलावडे दोघे रा लउळ ता माढा जि सोलापूर यांच्याविरूध्द तक्रार दाखल झाली आहे.

सन 2011 ते सन 2019 पर्यतच्या कालावधीमध्ये पाटील यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेचा खोटया व बनावट सहया करून रोखीने तसेच इतर खात्यावर पैसे वळवुुन भाउ लखोजी माधवराव खाटमोडे, वडील माधवराव तुलशिराम खाटमेाडे यांनी 96 लाख 39 हजार रूपयेचा अपहार केला असा आरोप आहे.
अपहार केलेल्या रकमेतुन लखोजी खाटमोडे याने बारामती येथे सदनिका खरेदी केल्याचे तसेच अज्ञात गांवी 20 ते 25 एकर जमीन खरेदी केल्याचे खात्रीशीर समजले, त्याची पत्नी राणी लखोजी खाटमोडे हिच्यासाठी बारामती येथील तसेच केत्तुर येथील सोनाराकडून अंदाजे 50 ते 60 तोळे सोने खरेदी केल्याचे व केत्तुर नं2 या गांवी मारूती विठठल येडे, राजाराम विठठल येडे व शहाजी विठठल येडे यांचा प्लट खरेदी केल्याचे तसेच टाटा हरीअर जिप नंबर एम.एच. 45 एर्र्इ 2151 ही खेरदी केली असे तक्रारीत म्हणले आहे.
तसेच लखोजी व माधवराव यांनी अपहार केलेल्या रक्कमेतील काही रक्कम ही सौ.मिरा सुनिल नलावडे हिला व तिचे पती सुनिल माणिकराव नलावडे रा.लउळ ता.माढा यांना घर बांधण्यासाठी दिल्याचे खात्रीशीर समजले असेही नमुद आहे.
म्हणुन 1) लखोजी माधवराव खाटमोडे,2) माधवराव तुळशीराम खाटमोडे , 3) राणी लखोजी खाटमोडे तिघे रा केत्तुर नं 2 ता करमाळा जि सोलापूर तसेच 4) सुनिल माणिकराव नलवडे 5) सौ मिरा सुनिल नलावडे दोघे रा लउळ ता माढा जि सोलापूर यांच्याविरूध्द कायदेशीर तक्रार केली आहे.