करमाळासोलापूर जिल्हा

शेतकरी कामगार संघर्ष समीतीकडुन सहा पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मान

करमाळा प्रतिनिधी


लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. कारण समाजातील चांगल्या व वाईट अशा दोन्ही बाजूंना समाजापुढे उत्तम प्रकारे मांडणारा वर्ग म्हणजे पत्रकार आहे. पत्रकार हा निर्भिड व समाजातील समस्या तसेच सर्वच बाबींकडे डोळसपणे पाहणारा असावा.

ज्यामुळे अशा पत्रकारांना समाजाचा आरसा म्हणून ही ओळखले जाते. खरे पाहता आज समाजामध्ये पत्रकारांचा उपयोग राजकीय मंडळींकडून फक्त प्रसिद्धीसाठी केला जातो. त्यामुळे खरी पत्रकारिता करीत असलेल्या पत्रकारांचे खऱ्या अर्थाने खच्चीकरण होते.

परंतु समाजामध्ये वावरत असताना समाजाचे चांगली किंवा वाईट प्रवृत्तींच्या थोड्याफार प्रमाणात का होईना ज्या-ज्या पत्रकारांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. व त्या बातम्यांचा ठसा काही प्रमाणात समाजमनावर दिसुन आला. अशा सकारात्मक व उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान शेतकरी कामगार संघर्ष समिती करमाळा यांच्या वतीने केला जाणार आहे. व अशा पत्रकारांना येणाऱ्या काळामध्ये आणखी सकारात्मक ऊर्जा मिळावी. हा उद्देश नजरेसमोर ठेवुन सदरील उपक्रम राबविला जात आहे. अशा प्रकारची माहिती, शेतकरी कामगार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष दशरथ (आण्णा) कांबळे यांनी दिली आहे.

शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे वितरित केले जाणारे पुरस्कार पुढीलप्रमाणे-
१) ॲड. बाबुराव हिरडे- (साप्ताहिक संदेश), २) पत्रकार, आलिम शेख- (दै.पुण्य नगरी) ३) पत्रकार, जयंत दळवी- (JRD माझा, Digital Media शहर), ४) पत्रकार, सिध्दार्थ वाघमारे (संघर्ष न्यूज सोलापूर- संपादक, Digital Media, शहर), ५) पत्रकार, शितलकुमार मोटे- (NTV News ग्रामीण), ६) पत्रकार, हर्षवर्धन गाडे- (लोकन्यूज24 ग्रामीण) अशा सहा उत्कृष्ट पत्रकारितेच्या पुरस्कारांचे वितरण माँ जिजाऊसाहेब यांच्या जयंतीदिनी, शेतकरी कामगार संघर्ष समिती संघटनेच्या कार्यालयात ठिक दु.- १२ वा. करमाळा तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे.

तर ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या प्रांगणात उपस्थितांच्या हस्ते वृक्षरोपण सुद्धा करण्यात येणार आहे. तरी सदरील कार्यक्रम कोरोनाची पार्श्वभुमी पाहता, हा कार्यक्रम पुरस्कार विजेते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केला जाणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE