करमाळासोलापूर जिल्हा

कोर्टी ते करमाळा रस्ता बनला मृत्यू चा सापळा- मांढरे-पाटील

 करमाळा समाचार – संजय साखरे 

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिशय रहदारी चा म्हणून ओळखला जाणारा रस्ता म्हणजे कोर्टी ते करमाळा रस्ता या रस्त्यावरून पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क हा तालुक्याच्या गावाला जोडणारा म्हणजे करमाळा जोडणारा आहे परंतु गेल्या सहा महिन्या पासून हा रस्ता वाहतुकीसाठी जीव घेणा ठरत आहे.

त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. गेल्या दोन महिन्या त्या रस्त्यावर अनेक मोठ मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये दोन ते तीन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. कुटुंबातील कर्ता पुरूषांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे.

राजूरी मधील एक कर्ता पुरुष यांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे. त्या नंतर दिव्हेगवण येथी व्यक्ती ला आपला जीव गमवावा लागला आहे. सावडी येथील एका युवकाचा घडलेल्या अपघात मुळे युवकाला आपला पाय गमवावा लागला आहे. छोटे छोटे अपघात तर दिवसाआड घडत आहेत आसे अनेक अपघात दररोज घडत आहेत आणि यांचे कारण म्हणजे तेथे सुरू आसलेल्या कामाच्या ठेकेदाराची मनमानी त्यामुळे हे अपघात घडत आहेत. रस्त्यावर अनेक मोठ मोठे खड्डे पडलेले आसताना देखील कित्येक वेळा मागणी करून देखील खड्डे बूजिवले जात नाही. जिथं चांगला रस्ता वाहतुकीसाठी आहे तो पूर्णपणे खोदलेला आहे आणि खड्डे पडलेले आसलेला रस्ता वाहतुकीसाठी जीव घेणा ठरत आहे. ठेकेदार व अधिकारी यांना कित्येक वेळा खड्डे बुडवण्याची मागणी केली आहे. परंतु त्या कडे ठेकेदार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

त्यामुळे दोन तीन दिवसात खड्डे नाही बूजिवले तर राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका वतीने कोर्टीत रस्तारोको आंदोलन करून घडलेल्या अपघाताला ठेकेदार जबाबदार धरून त्यांचा वरती सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आशी देखील मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत शिवाजी मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE