करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी हरिभाऊ गुळवे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधीःदिलीप दंगाणे


टाकळी तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री हरिभाऊ अंबादास गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच प्रक्रिया नूतन लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती रंजनाताई सुग्रीव दोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जि .प .सोलापूर उपाध्यक्ष आदरणीय श्री सुभाष आबा गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शेख साहेब तसेच ग्रामविकास अधिकारी म्हणून बदे साहेब यांनी काम पाहिले
विशेष म्हणजे नऊ सदस्यांची ही ग्रामपंचायत बॉडी असून नऊ ची नऊ सदस्य बिनविरोध आले होते.

फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागल्यानंतर श्री दत्त ग्रामविकास या पॅनल मधून सरपंच पदासाठी सौभाग्यवती रंजनाताई सुग्रीव दोडमिसे यांनी निवडणूक लढवली व त्या तब्बल 1176 एवढ्या मताने विजय झाल्या
नंतर उपसरपंच पदी श्री हरिभाऊ अंबादास गुळवे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपसरपंच हरिभाऊ गुळवे यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्युजशी बोलताना म्हणाले की टाकळी ग्रामस्थांनी आम्हाला मतदान रुपी दिलेल्या आशीर्वादाचे आम्ही सोने करू तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्न आम्ही तात्काळ मार्गी लावून गाव हे आमचे एक कुटुंब समजून आम्ही जनतेचे प्रश्न कुटुंबातील प्रश्न प्रमाणे मार्गी लावू असे उद्गार टाकळी गावचे उपसरपंच हरिभाऊ गुळवे यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजशी बोलताना सांगितले.

बिनविरोध सदस्य पदी गणेश कोकाटे सुवर्णा जाधव नीता लाळगे नितीन इरचे पोपट करचे पंचशीला रणदिवे साधना गोडसे प्रियंका हेडे बिनविरोध टाकळी ग्रामपंचायतचे सदस्य असून उपसरपंच निवडीच्या वेळी मोहन तात्या गुळवे रामभाऊ मामा धंगेकर संतोष बापू गुळवे तसेच चेअरमन सुग्रीव आबा दोडमिसे टाकळी गावचे माजी सरपंच अजिनाथ लाळगे रामभाऊ नाना कोकाटे तात्यासाहेब पाटील नामदेव गोडसे गोरख काकडे तंटामुक्ती अध्यक्ष एस टी आबा गुळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE