करमाळासोलापूर जिल्हा

जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी सप्ताह

करमाळा समाचार 

करमाळा मेडिकोज गिल्ड (  KMG ) ही एक करमाळा तालुक्यातील डॉक्टरांची संघटना आहे. दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त पूर्ण तालुक्यात महिलांसाठी मोफत गर्भाशयाचा कॅन्सर निदान व गरोदर स्त्री तपासणी शिबिर दि. 01 मार्च 2021 ते 07 मार्च 2021 या कालावधीत आयोजित करीत आहोत.

या शिबिराचे उदघाटन करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार मॅडम यांनी वेबिनार द्वारे केले.शिबिराच्या आयोजित कालावधीमध्ये गर्भाशय कॅन्सर स्क्रीनिंग pap smear द्वारे मोफत तपासणी करणार आहेत व संशयित रुग्णास पुढील दुर्बिणीद्वारे मोफत तपासणीसाठी डॉ. सौ.कविता कांबळे मॅडम कृष्णा हॉस्पिटल ,करमाळा. येथे पाठविणार आहोत.

तसेच गरोदर स्त्रियांची मोफत तपासणी करणार असून गरजवंत गरोदर स्त्रियांना मोफत सोनोग्राफी तपासणी साठी डॉ.आफ्रीन बागवान मॅडम बागवान हॉस्पिटल, करमाळा. येथे पाठविणार आहोत.

_तपासणी कोणी करावी ?_
1) अंगावरून पांढरे पाणी जात असल्यास…
2) पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होत असल्यास…
3) पाळी बंद झाल्यावर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाल्यास…
4) जर तुमच्या PAP  (पँप )  तपासणी मध्ये दोष असल्यास…
5) आपल्या जनेंद्रियामध्ये खाज ,फोड किंवा जखम असेल तर…
6) संभोगानंतर किंवा त्यावेळी दुखत व रक्तस्त्राव होत असल्यास…
7) तुमच्या परिवारात जर कोणाला गर्भाशय किंवा स्तन कँन्सर झाला असल्यास…
8) दोन पेक्षा जास्त गर्भपात झाले असल्यास…
9) जर आपले वय 30 वर्षापेक्षा जास्त असल्यास…
10) तुमच्या गर्भाशयाची जागा सरकली असल्यास…
11) गर्भनिरोधक गोळ्या जास्त दिवस घेतलेल्या असल्यास…
12) जर आपले बाळंतपण अयोग्य वयात झाले असल्यास…
          तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा हि विनंती.
       

करमाळा येथील मोफत तपासणीतालुक्यातील खालील ठिकाणी तज्ञ महिला डॉक्टरांनी तपासणी करून कार्ड भरून दिले तरच होणार आहे.
1)डॉ. सारीका दोभाडा ,केतूर नं 2 ,2)डॉ. विद्या दुरंदे  कोर्टी, 3)डॉ. अपर्णा गाडे ,वीट,4)डॉ. नंदा तळेकर , केम ,5)डॉ. सुजाता जांभळे ,केम, 6)डॉ. अभिलाषा भुजबळ ,वांगी, 7) डॉ. स्वाती व्हरे ,जेऊर 8)डॉ. भारती हजारे ,जेऊर,9)डॉ. अश्विनी बुधवंत ,रावगाव,10)डॉ. दिप्ती माने, देवळाली,11)डॉ. मनिषा माळवदकर, करमाळा ,12)डॉ. वर्षा करंजकर ,करमाळा.13) डॉ प्राजक्ता पाठक , कंदर

कार्यक्रमाचे आयोजक म्हणून…

डॉ सौ सुजाता ,जांभळे.   सौ.स्वाती साळुंखे
अध्यक्ष (KMG)           उपाध्यक्ष(KMG)
सौ .विद्या बारकुंड.         डॉ. सौ.दिप्ती माने
सचिव (KMG)            खजिनदार(KMG)
हे आहेत.
_सहकार्य म्हणून…_*
डॉ अंकुश तळेकर (अध्यक्ष ) ,केम.
डॉ हेमंत पांढरे ( उपाध्यक्ष ),जेऊर.
डॉ बालाजी वाघमोडे ( सचिव ),करमाळा
डॉ अमित सरडे (खजिनदार) कंदर
हे असणार आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE