करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चोरी झालेच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट ; चोरी झालीच नसल्याचे उघड

करमाळा समाचार

 

आज पहाटे अज्ञातांकडून संगोबा पाटबंधारे चौकीतून पाणी आडवणारी दरवाजे चोरीला गेले आहेत. यावेळी बोरगाव येथील शशिकांत नरुटे यांनी सदर गाडीचा पाठलाग करून त्याचा गाडी क्रमांक घेतला व पोलिसांकडे दिला आहे. त्यावर कारवाईची मागणी केली होती. पण या संदर्भात करमाळा समाचार च्या वतीने अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी चोरी झाली नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान खांबेवाडी येथील शेतकरी सुंदरदास हाके व गोपीनाथ मारकड हे पहाटे फिरत असताना त्यांनी सदरची घटना नरुटे यांना कळवली. यावेळी नरुटे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी पाहिले असता एक पिकअप सदरचे दरवाजे घेऊन जात होते नंतर नरुटे यांनी संबंधित गाडीचा पाठलाग केला व त्याचा गाडी क्रमांक मिळवला. तो क्रमांक पोलिसांकडे दिल्याची माहिती नरुटे यांनी दिली आहे. संबंधित पिकअप ताब्यात घेऊन मागील चोऱ्यांचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. त्याशिवाय संगोबा येथे पाहऱ्यासाठी चौकीदाराची नेमणूक करावी अशी विनंती केली होती.

http://*संगोबा येथे चोरी – चोरट्यांचा पाठलाग करुन गाडी क्रमांक दिला ; कारवाईची मागणी* https://karmalasamachar.com/at-sangoba-the-thieves-were-chased-and-given-car-numbers-demand-for-action/

यानंतर सदर घटनेचा तपास करीत असताना पाटबंधारे विभागाचे कर्मचाऱ्यांनी ही पोलिसात धाव घेतली व स्वतःही जाऊन चौकशी केली असता सदर चौकीवरील कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती त्यांना मिळाले आहे. तर त्या ठिकाणी प्रयत्न झालेला असू शकतो परंतु चोरी झाली नाही असं ठामपणे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नेमके काय प्रकरण आहे हे समजू शकले नाही. पण सध्या तरी चोरी झालीच नाही हे दिसून येत आहे.

यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी नरुटे यांनी केली आहे. यामध्ये पोलिसांनी माहीती घेतली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE