करमाळासोलापूर जिल्हा

भटकंती करणाऱ्या समाज्याच्या परिवाराबरोबर शिक्षकांने साजरा केला मुलीचा वाढदिवस

करमाळा समाचार 

भारत प्रायमरी स्कूल जेऊर येथील सहशिक्षक नितीन पाटील यांनी सामाजिक विषमता दुर करण्याच्या उद्देशाने आपली एकुलती एक मुलगी अमरिता हिचा वाढदिवस लातूर येथील भटकंती करून मूर्ती बनवून विकणा-या व जेऊर परिवारात वास्तव्यास असणा-या परिवारासोबत त्यांच्या पालावर जाऊन सामाजिक नियम पाळून साजरा केला.

त्या परिवाराच्या स्त्रियांनेही अमरिता चे औक्षण करुन चांगला प्रतिसाद दिला. त्यांचे बाळ गोपाळही त्यात सामिल झाले. सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामेळी त्या परिवारातील जेष्ठ सदस्य सय्यद हुसेन हसन म्हणाले कि,आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण प्रथमच आमच्या मुलांबरोबर आपल्या मुलीचा वाढदिवस सहपरीवाराबरोबर येऊन साजरा करणारा माणूस भेटला आमच्या मुलांना एक वेगळा आनंद मिळाला.

यावेळी निलेश पाटील, सुनिता पाटील, शितल पाटील, प्रियांका पाटील, रणजितसिंह पाटील, उदयसिंह पाटील, सरस्वती खांडेकर, शांताबाई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात बद्दल मा.आमदार नारायण आबा पाटील, मुख्याध्यापक दिपक व्यवहारे सर, मुख्याध्यापक केशव दहिभाते सर, प्राचार्य डाॅ.अनंत शिंगाडे सर प्रा.अर्जुन सरक सर ,सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील,किशोर गुळमे सर दिनेश देशपांडे सरआदी मान्यवरांनी नितीन पाटील सरांचे अभिनंदन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE