तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत शिंदे गटाला मोठा हादरा
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
वीट ग्रामपंचायत वर शिंदे गटाची एकहाती सत्ता होती. परंतु नाराजी पत्कारून शिंदे गटातुन पाटील गटात तीन सदस्यानी प्रवेश केल्याने शिंदे गटाला राजकिय वर्तुळात वीटमधुन भुकंप झाला आहे. वीट गावातुन राजकीय मोठा नेता म्हणून भोसले यांच्याकडे पाहिले जाते जिकडे भोसले तिकडे आजपर्यंतची सत्ता कायम मानली जाते. यावेळेस भोसले विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या गटात काम करत होते. म्हणुन सत्ता शिंदे गटाची मानली जात होती.

परंतु गावातून शिंदे गटावर नाराज होऊन माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटात तीन सदस्यानी प्रवेश केल्यानंतर मला उपसरपंच पदाचा बहुमान मिळाला व बागल यांचे सहकार्य घेऊन पाटील गटाचे नेते जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे यांनी मला उपसरपंच पदांची संधी दिली या संधीचे मी गावातील रखडलेल्या कामासाठी वेळ खर्च करणार व जास्त जास्तीत विकास कामांवर भर देणार असे विद्यमान उपसरपंच सौ.अनुराधा कांबळे म्हणाले.

मला उपसरपंच पदापर्यंत पोहोचवणारे माझे पती समाधान कांबळे, सचिन गणगे, ज्योतीराम राऊत सुभाष आवटे अरविंद जाधव राजु गाडे श्रीरंग जाधव, नवनाथ जाधव, डॉ भागवत ढेरे,या ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने तसेच गोरख ढेरे सर, सुभाष जाधव नागनाथ आवटे, शिवाजी गाडे, मच्छिंद्र जाधव,विशाल गाडे, हनुमंत आवटे , अकुश जगदाळे पै. बिभीषण ढेरे पै.हनुमंत ढेरे संतोष जाधव,पप्पु चोपडे अरविंद ढेरे यांचे सहकार्य लाभले असे अनुराधा कांबळे म्हणाल्या.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सलीम शेख यांनी कामकाज पाहिले.