करमाळासोलापूर जिल्हा

उपसभापती दत्तात्रय सरडे यांच्या हस्ते पै.गौतम शिंदे यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे हे कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले पैलवान असल्याने त्यांना कुस्ती क्षेत्रातील पत्येक मल्लाचा अभिमान वाटतो. त्यामुळे नावारूपाला आलेल्या पैलवानांना गती देण्यासाठी व त्यांच्या अंगावर कौतुकाची थाप मारण्याच काम नेहमीच करत असतात. त्यामुळे पै गौतम सुरेश शिंदे या पैलवानचा सत्कार करण्यात आला. आगोदरही त्यांनी कुस्ती क्षेत्रात गदा मिळवला होता. त्यावेळेस त्याना‌ सत्कार करून आपले एक महिन्याचे मानधन दिले होते. त्याची उतराई थोड्या दिवसांत पै.गौतम शिंदे याने करून दाखवली.

पै.गौतम सुरेश शिंदे याची कुस्ती स्पर्धांसाठी नोएडा, उत्तर प्रदेशला निवड झाल्याची बातमी समजताच सरडे यांनी पंचायत समिती कार्यालय येथे बोलावुन शिंदे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. नुकतीच पै.गौतम सुरेश शिंदे यांची. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन पुणे येथे 23 एप्रिल रोजी जुनिअर फ्री स्टाईल महाराष्ट्र कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये महाराष्ट्र संघातील पैलवान मुला मुलींनी सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धेत पोथरे ता.करमाळा येथील पै.गौतम शिंदे याने मॅटवर ८० किलो गटात पै शुभम मगर यांच्यावर मात करून यशस्वी यश संपादीत करून विजय मिळवला. त्याबद्दल त्यांची नोएडा उत्तर प्रदेश येथे निवड झाली आहे.या कुस्त्या 2 ते 4 एप्रिलला नोएडा,उत्तर प्रदेश येथे पार पडणार असल्याने उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, पंचायतीच्या समितीचे माजी सभापती शेखरजी गाडे व विद्यमान सदस्य , दत्तात्रय जाधव सदस्य, पैलवान सुरेश शिंदे पैलवान बाळासाहेब पवार.,पैलवान बंडा सुरवसे मिरगव्हन आदि उपस्थित .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE