करमाळ्याच्या कोविड योद्ध्यालाच कोरोनाचा विळखा, मदतीचे आवाहन…
करमाळा समाचार
गेल्या वर्षभरापासून गावातील व परिसरातील तब्बल ३१२ कोरोना रूग्णाला उपचारासाठी घरापासून हॉस्पिटल व पुन्हा घरी आपल्या चारचाकी गाडीतून सोडवण्याचे काम करणाऱ्या शेटफळ ता. करमाळा येथील सोमनाथ (भैया) माने (वय २८) यालाच कोरोनाने गाठले.

श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्याने त्याला बार्शी येथे हलविण्यात आले, त्रास वाढल्याने व्हॅंटिलेटर बेडची गरज होती, अनेक प्रयत्न करूनही बार्शीत बेड उपलब्ध झाला नाही. शेटफळ गावचे सुपुत्र डॉ. सुहास लबडे यांच्या प्रयत्नातून बेड उपलब्ध होऊन बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या त्याची कोरोनाशी झुंज सुरू आसून त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. माने याची घरची परिस्थिती हालाखीची असून वयाच्या आठ वर्षांपासून त्याने अनेकांच्या दुकानात काम करण्यापासून घरप्रपंचाला हातभार लावला.

नंतरच्या काळात चारचाकी गाडी शिकून अनेक दिवस लोकांच्या खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम केले. गेल्या वर्षी गावातील मित्रमंडळींच्या सहकार्यातून एक जुनी चारचाकी खरेदी करून गावात गरजेच्या वेळी भाडे करण्याचे काम करत होता.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये गाड्यांची भाडी कमी झाल्याने गाडी बसुन राहू लागली गाडीचे हाप्ते फेडण्यासाठी गाडीला भाडे मिळणे गरजेचे होते आशा वेळी त्याने गावातील व परिसरातील कोरोनाचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याचे काम करत होता. कोरोनाचे रूग्ण वाहतूक सुरू केल्यानंतर इतर लोकांनी त्याची गाडी भाड्याने करणे बंद केले.
सध्या स्वतः ची काळजी घेत हेच काम तो करत होता परंतु काहीसा गाफील राहील्याने त्यालाच कोरोनाचा संसर्ग झाला. स्थानिक दवाखान्यात किरकोळ उपचार घेले सुरवातीला मला काय होतय या भ्रमात राहील्याने अचानक त्रास वाढला. सध्या बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
परिसरातील अनेक रूग्णांची सेवा केलेल्या या कोरोना योद्ध्याला आपल्या सदिच्छा व आर्थिक मदतीची गरज आहे. शेटफळ गावातील अनेकजण उस्फुर्त मदत करत आहेत पण उपचारासाठी खर्च मोठा आहे. मदतीसाठी अनखी हात पुढे आले तर माने कुटुंबाला दिलासा मिळेल.
▪️ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपली मदत कृष्णा सातपुते यांच्या 7414967003 या नं. ला फोन पे किंवा गुगल पे यांच्याकडे जमा करावी.
किंवा
A/C Name Mahesh Satpute
Bank Name Union Bank Of India
A/C 476601010100332
IFSC code UBIN0547662
Branch Chikalthan
वरील क्रमांकाच्या बँक अकाउंट वर जमा करावी. रक्कम पाठवल्यानंतर कृपया स्क्रीन शॉट काढून वरिल नंबर वर पाठवावा.
“आता हीच वेळ आहे आपल्याला माणसातील माणुसकी दाखवण्याची”
आपल्या आवाहनाला प्रतिसाद यायला सुरुवात …