सोलापूर जिल्हा

रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

श्रीरामनवमी निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे आयोजित ऑनलाईन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी १ हजाराहून अधिक रामभक्तांची उपस्थित

सोलापूर – रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारे मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम होय. प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य रामनवमीच्या निमित्ताने स्थापण्याचा निर्धार करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

ते श्रीराम नवमीच्या दिवशी सोलपूर येथे आयोजित ऑनलाईन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्यासाठी १ हजाराहून अधिक रामभक्त उपस्थित होते.

या सोहळ्यात ऑनलाईन श्रीराम नामजप, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्रीरामाचा पाळणा ऐकणे आणि रामराज्यासाठी प्रतिज्ञा घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले, श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम । हा नामजप अधिकाधिक करावा. धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् मर्यादापुरुषोत्तम, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे श्रीराम ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE