करमाळासोलापूर जिल्हा

गुळाला मुंगळे चिकटल्यासारखे इथेच अडकुन पडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

करमाळा प्रतिनिधी – संजय साखरे 

करमाळा तालुक्यातील स्थानिक रहिवासी असणारे अधिकारी अनेक वर्षापासून गुळाला मुंगळा चिकटल्या सारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्याची मागणी आपण आमदार संजयमामा शिंदे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री हनुमंत मांढरे पाटील यांनी दिली.

करमाळा तालुक्यातील स्थानिक रहिवासी असणारे अधिकारी तालुक्यातील असल्यामुळे गोरगरीब कष्टकरी जनतेची कामे होत नाहीत, हे अधिकारी निपक्षपातीपणे काम करत नाहीत. गोर गरीब शेतकऱ्यांना एका कामासाठी आपली शेतीची सर्व कामे सोडून अनेक चकरा शासकीय ऑफिसमध्ये माराव्या लागत आहेत. या अधिकाऱ्यांचे तालुक्यातील अनेक गावात पाहुणे आहेत. कोण कोणाच्या जवळचा मग त्यांची कामे मात्र ते वशिला लावून लगेच करतात .

एखाद्या पाहुण्याने सांगितले की लगेच काम होते, याचा गोरगरीब लोकांना नाहक त्रास होत आहे. शेतकऱ्यांनी कष्ट करून स्वतःच्या पैशाने घेतलेल्या शेतजमिनीच्या नोंदीसाठी त्या शेतकऱ्यांना तलाठी ऑफिस व तहसील ऑफिसला अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत.

त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून त्यांच्या जागी नवीन, कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी आपण करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये करमाळ्याच्या तहसीलदारपदी श्री समीर माने यांची नियुक्ती झाल्यापासून अशा अधिकाऱ्यांना थोडाफार वचक बसला असला तरी त्यांचा मग्रुरी पणा अद्याप कमी झालेला नाही.याउलट तहसीलदार यांनी ते चुकीची माहिती सांगत आहेत.

त्यामुळे त्यांच्या बदल्या केल्या तरच तालुक्यातील जनतेला व गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळेल.अशा आपणास विश्वास वाटतो.त्यामुळे आपण हा प्रश्न लावून धरणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE