करमाळासोलापूर जिल्हा

जिल्हा परिषद अध्यक्षाच्या तालुक्यात रस्त्याची दुरावस्था ; मागणी पुर्ण करा अन्यथा अधिकारी कोंडु

करमाळा समाचार 

शेलगाव ते वांगी – ०२ या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वांगी – ०२ जवळील अनेक गावांच्या समोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी तसेच लघु उद्योजकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. आणि यात अनेकांना अर्धांग गमवावे लागले आहे. तर काहींचा या रस्त्यावर अपघात झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले. रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही.

सदर रस्ता जिल्हा परिषद कडे ऐत आसून करमाळा तालुक्यातील जि प अध्यक्ष आसून ही रस्त्याची ही अवस्था आहे. येथील जि.प सदस्य आणी अधिकारी झोपा काडत आहेत काय ? यांची झोप आता जनशक्ती संघटना उडविल्याशिवाय राहणार नाही असे खुपसे पाटिल म्हणाले
प्रशासन आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित केला जात आहे. तक्रार करून प्रशासन जागे होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटिल यांच्याकडे फोन करून तक्रार दिली आहे. यावर अतुल खूपसे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जर प्रशासनाने लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लावला तर संबंधित अधिकऱ्यांना कोंडून ठेऊ असा इशारा खूपसे पाटिल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

संबंधित रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मी संबंधित आशिकऱ्यांशी बोललो आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी नाही लागला. तर सदर प्रकरणाला मी वेगळं वळण देऊन, संबंधित अधिकाऱ्यांना डांबून ठेवेल. तसेच जोपर्यंत हा रस्ता होऊन ग्रामस्थांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत या रस्त्या संबंधी पाठपुरावा मी करत राहील. अधिकाऱ्यांनी जर पुढील दोन दिवसात कारवाईला सुरुवात नाही केली तर आम्ही शेतकरी, ग्रामस्थ आणि जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल.
– अतुल खूपसे पाटिल (अध्यक्ष जनशक्ती संघटना)

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE