करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; अवैधरिता दारु वाहतुक करताना 7 लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात
करमाळा समाचार
करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी केली आहे. अवैधरीत्या दारु विक्रीसाठी नेत असताना एकास जागेवर पकडले असुन त्याकडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. करमाळा पोलीस ठाणे कडील पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर, पोलीस कॉन्स्टेबल ढवळे,लोंढे टेंभुर्णी ते अहमदनगर जाणारे हायवे रोड वरती पेट्रोलिंग करत असताना बातमीदार मार्फत त्यांना माहिती मिळाली होती.

एक इसम पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडीमधून दारुच्या बाटल्या घेऊन जात आहे. लागलीच त्यांनी सापळा रचून सदर गाडीला टेंभुर्णी ते अहमदनगर जाणारे हायवे रोड वरती नालबंद मंगल कार्यालयाजवळ पकडले. सदर गाडी चेक केले असता सदर गाडीमध्ये निलेश बाबासाहेब हंगे राहणार सोनारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद व देशी दारू संत्रा कंपनीचे दारूचे बॉक्स आढळून आले.

अशाप्रकारे देशी दारू संत्रा कंपनी च्या 180 मिली च्या 3264 सीलबंद बाटल्या व एक महिंद्रा बोलेरो कंपनीची चार चाकी गाडी तिचा आरटीओ नंबर एम एच 25 आर 8142 असा 7,09,728/- रुपये किमतीचा मुद्देमाल प्रोव्हीशन गुन्ह्याच्या कामी जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर करत आहेत.