E-Paperकरमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात मागील दोन वर्षापासुन बिबट्याचे वास्तव्य ; नरभक्षकानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्याने भिती

करमाळा समाचार 

लिंबेवाडीत बिबट्या दिसल्याची चर्चा

नरभक्षक बिबट्या ठार केल्यानंतरही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्या बाबत चर्चा आहे. तर नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात एन्ट्री करण्यापूर्वी ही बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याबाबत तक्रारी होत्या. मागील अनेक दिवसांपासून बिबट्यांचे वास्तव्य जरी असले तरी पाळीव प्राण्यावर किंवा मनुष्यावर हल्ला केल्याची घटना घडलेली दिसून येत नाही. तर दोन दिवसापूर्वी वांगी परिसतात तर काल लिंबेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. 

दोन वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातून उंदरगाव येथे अशाच एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. त्यावेळीही पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्यानंतर स्थानिक भागातून पावलांचे ठसे व इतर माहितीच्या आधारे बिबट्याचा असल्याचे सिद्ध झालं होतं. पशुधन मारलं जातंय म्हणून लोकांच्या तक्रारी होत्या. त्यावेळी त्याला पिंजरा लावून पकडण्यात आले. तेव्हापासून आज पर्यंत विविध ठिकाणी त्याच पद्धतीचे हल्ले झाले. पण वन विभाग त्यास तरसाचे नाव देऊन वेळ मारून नेली होती.

तर मागील दोन वर्षांपासून क्वचितच कुठेतरी पाळीव प्राण्यांवर खाल्ले होत असताना बिबट्या आपल्या भागात आहे की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडले होते. पण बिबट्या हल्ले करण्याचे प्रमाण मानवी वस्तीत जरी कमी झालं होतं तरी बिबट्या नाही असे म्हणून चालणार नाही. बिबट्या मुख्यतः रात्री शिकारीला बाहेर पडतो. त्यावेळी बरेचसे लोक व नागरिक हे घरातच असतात. त्यामुळे बिबट्याचा व नागरिकांचा आमना-सामना होणे तसे कठीणच आहे. त्याशिवाय पाळीव प्राणीही एकापेक्षा जास्त एकाच ठिकाणी असल्याने किंवा वाडी-वस्तीवर गोठ्यात किंवा घराच्या आसपास असल्याने त्याठिकाणी बिबट्या प्रवेश करण्यासाठी घाबरत ही असेल. त्यामुळे हल्ले होऊ शकत नव्हते किंवा त्याचे प्रमाण कमी झाले होते.

वांगी परिसरात पावलांचे ठसे

मग पाळीव प्राण्यांना हल्ले होत नसताना बिबट्या खात काय होता हा मोठा प्रश्न आहे. पण उसाच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर रानडुकरांनी शेतकऱ्यांना त्रास दिलेला होता. त्यावेळी या बिबट्यांना रानडुकरा सारखे मोठे भक्ष मिळू लागले. त्यामुळे बिबट्यांनी त्याच्यावरच आपली भूक भागवण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतीत होणारा रान डुकरांचा हैदोसही कमी प्रमाणात होऊ लागला होता. आता त्यांची संख्या ही थोडीशी कमी प्रमाणात झालेली असावी. त्यामुळेच बिबट्या हे शेती व जंगलाचा परिसर सोडून आता मानवी वस्तीकडे कूच करू लागला आहे अशावेळी बिबट्या मानवी वस्तीकडे आलेला असताना वन विभागाने सुचवलेले उपाय योजना राबविल्यास त्याचा समोरासमोर आमना – सामना न झाल्यास तोही मनुष्याला हनी करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकच वेळी बिबट्याला घाबरून जाण्यासारखे काहीच नाही वन विभागाच्या वतीने सांगितली गेलेली काळजी मात्र घेणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE