आदिनाथ अभंग यांचे निधन ; मुख्याध्यापक पदासह आदर्श शिक्षक म्हणुन ख्याती
करमाळा समाचार
आदर्श निवृत्त शिक्षक आदिनाथ काशिनाथ अभंग वय ७४ यांचे आज दिनांक १९ यांचे अल्पशा आजाराने सि एन एस हास्पिटल सोलापूर मध्ये पहाटे ३.४० वा. निधन झाले. आदिनाथ अभंग हे करमाळा पंचायत समितीचे द्वितीय सभापती कै. काशिनाथ अभंग यांचे जेष्ठ चिरंजीव. ते काही काळ छ. शिवाजी हायस्कूल कोर्टीचे मुख्याध्यापक होते.

सध्या ते छ. शिवाजी हायस्कूल कोर्टीचे सचिव म्हणून काम पाहत होते. सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे ते संचालक होते. सोलापूर जिल्हा समता परिषद व माळी संघटनेचे ते मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते. छ. शिवाजी हायस्कूल ही संस्था त्यांनी अनेक अडचणींवर मात करून उत्तम प्रकारे सांभाळली. कोर्टी गावातील कोणत्याही सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रात त्यांचा सहभाग असायचा.

त्यांचे पश्चात त्यांना २ मुले (डॉक्टर महेश अभंग आयुर्वेदाचार्य व अनुप अभंग प्रसिद्ध विधीतज्ञ पुणे), २ मुली (सौ.अश्विनी नाळे विहाळ व सौ मिनल बनसुडे करमाळा) आहेत. त्यांचे निधनानंतर अनेक मान्यवरांनी दूरध्वनी द्वारे सांत्वन केले आहे. त्यामध्ये संजय मामा शिंदे आमदार करमाळा, कृषि रत्न आनंद कोठाडिया, आप्पासाहेब झांजुर्ण, सुजित बागल, उध्दवदादा माळी मा.जि. प. सदस्य, बाळासाहेब माळी मा. जि. प. सदस्य, रघुनाथ कोल्हे मा.सभापती बांधकाम सोलापूर, तात्यासाहेब मस्कर. प्रशांत शिंदे अध्यक्ष माळी संघटना करमाळा, रामकृष्ण माने, संजय जाधव मा. उपसभापती करमाळा व तालुक्यातील सर्व आजी माजी मुख्याध्यापक व शिक्षक यांचा समावेश आहे.