करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

नवे जोडपे घेऊन देवदर्शनासाठी जाताना अपघात ; चार ठार चार जखमी

करमाळा समाचार

नवीन जोडप्याला देवदर्शन करून आणण्यासाठी निघालेल्या गुलबर्गा येथील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तवेरा व कंटेनरच्या धडकेत चार जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास पांडे शिवारात घडला आहे.

कुंभार कुटुंबीय शिर्डीला देवदर्शनाला जाण्यासाठी करमाळा सालसे रस्त्याने निघाले असता समोरून येत असलेल्या कंटेनरला जाऊन धडकल्यामुळे सदरचा अपघात घडला. सदरची कारगाडी ही रस्त्याखाली जाऊन आदळली. यावेळी गाडीचा संपूर्ण चुराडा झाल्याचे दिसून आले. टवेरा गाडीत असलेल्या जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे.

यामध्ये चौघे ठार तर चौघे जखमी झाले आहेत. पहाटे सदरचा अपघात घडल्यानंतर पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल आनंद पवार यांनी ॲम्बुलन्स व इतर लोकांना तात्काळ बोलवले. यावेळी 108 क्रमांक असलेली ॲम्बुलन्स तसेच माजी सैनिक ॲम्बुलन्स (साजिद शेख) व बबलू भिसे यांचीही ॲम्बुलन्स तात्काळ पोहोचली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू झाले. यावेळी पांडे शिवारातील ग्रामस्थांनीही सदरच्या जखमींना दवाखान्यात पाठवण्यासाठी प्रयत्न केले.

यामध्ये शशिकला कुंभार, शारदा कुंभार, श्रीशैल कुंभार व ज्योती हुनशालमठ हे मयत झालेल्यांची नावे आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE