ग्रामसडक योजनेतून 5 रस्त्यांसाठी 25 कोटी निधी मंजूर
प्रतिनिधी – करमाळा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार , ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या विशेष सहकार्यातून करमाळा – माढा मतदारसंघासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 5 रस्त्यांसाठी 25 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

या रस्त्यामध्ये रामा 8 जेऊर ते जेऊरवाडी- शिरसकरवाडी- पोपळज- नाना मारकड वस्ती या रस्त्यासाठी 4 कोटी 21 लाख 34 हजार , रामा 8 ते कुंभेज ते गुळसडी या रस्त्यासाठी 4 कोटी 84 लाख 94 हजार, ग्रामा 5 वाशिंबे ते राजुरी या रस्त्यासाठी 4 कोटी 21 लाख 44 हजार , ग्रामा 13 चोभेपिंपरी ते रोपळे क या रस्त्यासाठी 7 कोटी 15 लाख 96 हजार एवढा निधी मंजूर झाला असून त्याचे पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. हा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्र शासनाचे ही आभार आ.शिंदे यांनी मानले
कुर्डूवाडी ते वागेगव्हाण या रस्त्यासाठी लवकरच 5 कोटी मंजूर होणार….
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून येत्या 8 दिवसात कुर्डवाडी ते वागेगव्हाण या रस्त्यासाठी 5 कोटी निधी मंजूर होणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
