माजी आ जगताप यांचे विरोधातील अपील फेटाळले
करमाळा समाचार
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे बाजार समिती सदस्यत्व रद्द करणे बाबतचे दाखल केलेले अपील जिल्हा उपनिबंधक सह संस्था सोलापूर यांनी फेटाळले आहे .

यामुळे जगताप गटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून विरोधी गटात अस्वस्थता पसरली आहे. दि २१ मे रोजी याबाबतचा आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी पारीत केला आहे . यात जगताप यांचे वतीने अँड. कमलाकर वीर यांनी काम पाहीले .

माजी आ .जगताप हे सन १९८९ पासून २०१८ पर्यंत सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती होते . जगताप यांचे कारकिर्दीत बाजार समितीचा विश्वास व नावलौकिक वाढला होता. जगताप यांचे एकहाती नेतृत्वामुळे बाजार समितीचा कारभार पारदर्शी व लोकाभिमुख तसेच खर्या अर्थाने शेतकरी हिताचा झाला होत . मध्यंतरीच्या काळात राजकीय कुरघोड्यांमुळे व षडयंत्रांमुळे जगताप गट सत्तेपासून वंचित राहून फार त्रास सोसावा लागला होता. परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर जगताप गटाची यशस्वी वाटचाल चालूच आहे.