करमाळासोलापूर जिल्हा

बाजार समीती सचिवपदी विठ्ठल क्षीरसागर यांची वर्णी ; सभापती प्रा. बंडगर यांच्या मनसुब्यावर पाणी

करमाळा समाचार

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीत सभापती बंडगर व बागल गटाच्या मनसुभ्यावर पाणी फेरले गेले आहे. सचिव शिंदे यांच्या निवृत्तीनंतर बंडगर यांना पाटणे यांना सचिव करायचे होते. पण सेवाजेष्ठते प्रमाणे विठ्ठल क्षीरसागर यांची वर्णी लावत त्यांच्या बंडगर यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे संख्याबळ कमी असतानाही माजी आमदार जयवंतराव जगताप यांची ताकद दिसुन येत आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव श्री. सुनील शिंदे यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या मंजूर सेवानियमातील नियम क्र . ४५ नुसार सेवा ज्येष्ठ कमेचारी श्री विठ्ठल क्षीरसागर यांचेकडे कायद्यातील तरतूदीनुसार रितसर कार्यभार सोपविला व क्षीरसागर यांनी चार्ज स्विकारला व मा . पणन संचालक, मा . जिल्हा उपनिबंधक सह . संस्था सोलापूर व मा सहाय्यक निबंधक सह संस्था करमाळा यांनी रितसर कळविले आहे .

श्री . क्षीरसागर यांनी २५ मे रोजीच सभापती / सचिव व ए. आर / डीडी आर / पणन संचालक यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सचिव पदी बढतीस पात्र असलेबाबत व चार्ज स्विकारण्यास तयार असलेबाबत लेखी कळवून विनंती केली होती . कर्मचारी सेवा नियमातील तरतूदीनुसार शास्तीची कारवाई होवून बढती रोखलेल्या कर्मचार्‍याचा सेवाज्येष्ठतेतील क्रम हा सर्वात खालचा असतो त्यामुळे श्री शिंदे व श्री क्षीरसागर यांनी कायदेशीर कार्यवाही केलेली आहे .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE