E-Paperसोलापूर जिल्हा

जिल्हाधिकारी शंभरकर यांचे नवे आदेश ; यामध्ये काय सुरु काय बंद

सोलापूर – 

ग्रामीण भागातील रूग्णसंख्या अजूनही कमी झालेली नसून मृत्यूदरही चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील कडक लॉकडाउन (Lockdown) 15 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. दरम्यान, ज्या शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हर दर 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची दुकाने सुरू करण्यासंदर्भात निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, सोलापूर शहर व ग्रामीण भागातील दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता ज्या पध्दतीने अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरू असून काही दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरापर्यंत करण्यात आली आहे.

आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहणार…

किराणा दुकाने, भाजीपाला, डेअरी, बेकरीसह अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांना सकाळी सात ते अकरापर्यंतच परवानगी, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पार्सल व घरपोच सेवेसाठी सकाळी सात ते रात्री आठपर्यंत दिली मुभा ; हॉटेल, बार, रेस्टॉरंट राहणार बंदच, पण होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला परवानगी ; सार्वजनिक वाहतूक, टॅक्‍सी, बससेवा सुरू होईल; पण प्रवाशांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच पाळावी लागणार; विवाहासाठी 25 व्यक्‍तींची मर्यादा; विवाह समारंभातील कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक; परीक्षांना सवलती, 12 वी परीक्षेसाठी सवलत मात्र परीक्षेसंबंधित सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची अट

काय बंद राहणार…

शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच ; मंदिरे, धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच; नियम पाळून नित्यपूजा करता येईल; सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाची कोणतीही सेवा सुरू राहणार नाही; अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी नाही ; आदेशातून शेतकऱ्यांना दिलासा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE