E-Paper

ग्राम संवाद सरपंच संघ “महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री सतिश भुई

महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या व कार्यरतअसलेल्या “ग्राम संवाद सरपंच संघ” महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री सतिश सुरेश भुई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व ओबीसी फाउंडेशन चे युवा जिल्हाध्यक्ष सतीश भुई यांनी पिराची कुरोली पंचक्रोशी मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून तरुण युवकांचे संघटन केले आहे.

तसेच गावात करत असलेल्या कार्याची दखल घेत “ग्राम संवाद सरपंच संघ” महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्र ग्राम संवाद सरपंच संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सतीशदादा म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी सरपंच , उपसरपंच , सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन करून “ग्रामसंवाद सरपंच संघ” वाढवण्याकरता व बळकट करण्याकरता महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच , सदस्य तसेच लहान मोठ्या वंचित तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तसेच न्याय व हक्क मिळवून देणे करता नेहमीच प्रयत्नशील असेल गावात वेगवेगळ्या समाज उपयोगी योजना आणून विकास करण्याचा प्रयत्न करीन त्यांच्या निवडीबद्दल माढा मतदार संघाचे आमदार मा.बबनदादा शिंदे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर लामकाने, माजी संचालक पंढरीनाथ लामकाने, संचालक बाळासाहेब कौलगे, माजी संचालक रामचंद्र कौलगे, पांडुरंग कौलगे, प्रभात डेरी चेअध्यक्ष उद्धव कौलगे, फिषेरमन काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष नंदकुमारभुई, पिराची कुरोली सोसायटीचे चेअरमन वसंत गायकवाड, व्हा.चेअरमन विठ्ठल पाटील, गोपाळ लामकाने, सचिव तुकाराम भुई, भोसेकर साहेब प्राचार्य जमदाडे सर, खरात सर, शिक्षक अफसर, मुलाणी सर, भोसले सर, चव्हाण सर करकमकर सर तलाठी गुसिंगे साहेबअनिल सोनवले ग्रामसेवक भोसले साहेब सरपंच मुमताज शेख उपसरपंच रंजीत लामकाने पोलीस पाटील शरद कौलगे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा भुई अनिल लामकाने, महादेव सोनवले प्रकाश सोनवले विकास रामगुडे पांडुरंग कौलगे कुलदीप कौलगे बाळकृष्ण कौलगे दादा सावंत योगेश होनमाने ॲड .बाळासाहेब लामकाने क्लार्क भिमराव खर्चे बापू कौलगे डॉ.भिंगारे डॉ.काटकर तसेच पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE