करमाळाकृषीसहकारसोलापूर जिल्हा

लोकांच्या जीवापेक्षा तुमचे राजकारण महत्वाचे नाही ; आता तरी राजकारण थांबवा

करमाळा समाचार 

लॉकडाऊन मुळे अनेकांच्या हाताला काम नाही. अनेकांचा संसार कोलमडला आहे. थोड्याच कालावधीत जगावे की मरावे असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. पण मागील 2015 पासून तब्बल 50 पेक्षा जास्त पगारी थकलेल्या असल्याने श्री अदिनाथ साखर कारखान्याचे कामगार कसे जगत असतील ते त्यांचे त्यांनाच माहीत. तरीही काहीजण या आडून राजकारण करायचे सोडत नाहीत. यामध्ये कर्मचारी नेत्यांचाही समावेश आहे. मुळातच वाद घालून कारखाना कायमचा बंद पाण्यापर्यंत यांची मजल जाऊन पोहोचली आहे.

सहाजिक आहे कारखाना बागल गटाच्या ताब्यात आहे. बागलांसह सर्वच नेत्यांनी या कारखान्यावर राज्य केले आहे. कारखान्याची अधोगती होण्यासाठी कोण एक माणूस किंवा एक गट जबाबदार नसून प्रत्येकजण त्यात वाटेकरी असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना बागल यांना विरोध करण्यासाठी राजकारण करत आहेत. तर काहींना दुसरे पर्याय बंद झाल्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कामगार व कारखान्याची गरज पडत आहे.

ज्यावेळी स्वतःवर काही अडचणी आल्या त्यावेळी काही स्वहितासाठी बाहेर पडलेले नेतेमंडळींनी कारखाना पुन्हा सुरु कसा येईल त्यापेक्षा सत्ताधारी कसे अडचणीत येतील याकडे अधिक लक्ष दिले. त्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या पगारी कशा सुरू होतील याकडे लक्ष दिले असते तर आतापर्यंत उपासमारीची वेळ त्या कर्मचाऱ्यावर आली नसती.

कारखान्यांमुळे बागल गटाला विधानसभेला त्यांच्या चुकांची किंमत मोजावी लागली आहे. जवळपास तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला किंवा येणाऱ्या काळात गट संपूनही जाईल. पण त्यांचा राग काढण्यासाठी कारखान्यावर निशाना साधने चुकीचे आहे. कारखाना रोहित पवारांनी चालूद्या किंवा माजी आमदार पाटलांनी किंवा आ. शिंदे यांनी कारखाना चालणे महत्त्वाचे आहे. पण मागील देणे व इतर विषयांवरून आजही राजकारण करुन कारखाना कसा कसा बंद पडेल याकडे काही जण आवर्जून लक्ष देताना दिसून येत आहे. त्यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ ही असू शकतो.

कारखाना आज बंदच असल्याने अजून नुकसान झाले. तरी कारखान्याला काही फरक पडणार नाही. पण जर आज कारखाना सुरू झाला असता तर कमीतकमी पुढच्या एक महिन्यात घरात भाकर खाण्यासाठी किराणा भरण्यासाठी कामगारांच्या खिशात पगार आली असती. पण मोठ्या बंगल्यातील एसी मध्ये राहणाऱ्या नेत्यांना त्याची काय कदर ते आजही मागील पगार म्हणून कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारखाना परिस्थिती सुधारेल तसे मागील देणेही देईल पण तसा विचार कोणी करताना दिसत नाही. स्वयंभू कामगारांचे नेते स्वार्थासाठी कामगारांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे सध्यातरी कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. कारखाना सुस्थितीत आल्यानंतर आपोआपच देणे मिळणार आहेत.

काही दिवसांसाठी लागणारा लॉकडाउन यामुळे झालेली आपली परिस्थिती व भटकंती करण्याची वेळ आलेली असताना कामगारांवर काय परिस्थिती असेल याचीही कल्पना न केलेली बरी. त्यांचं घर कोण चालवत असेल. त्यांच्या दवाखान्याचा खर्च कोण भागवत असेल. अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी लाईट सोय नव्हती. वीज बिल थकल्याने कनेक्शन कट केले होते, कशा पद्धतीने ते राहत असतील, कसे जगत असतील याचाही भान ठेवून सर्वांनी राजकारण केले पाहिजे. लोकडाऊनमुळे सर्वांच्या घरोघरी किराणा कीट जात होती. पण मागील पाच वर्षांपासून ज्यांची पगार झाली नाही त्यांचे किट कसे जात असेल. त्यांचा किराणा कोण भरत असेल याची कुणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आता तरी कर्मचाऱी नेत्यांनी राजकारण न करता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व कारखान्यासाठी स्वार्थ बाजूला ठेऊन कारखाना सुरु होण्याकडे लक्ष द्यावे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE