E-Paperकरमाळाक्राईममाढामोहोळसोलापूर जिल्हा

अजब शक्कल – बनावट सोने देऊन लुटणाऱ्या टोळीचा मोहोळ पोलिसांकडुन पर्दाफाश ; टोळीत माढा, सांगली, मोहोळ, कोल्हापूर येथील आरोपींचा समावेश

करमाळा समाचार – मोहोळ 

दिल्लीमधून बनावट सोन्याच्या साखळ्या वर हॉल मार्क लावून मोठ्या प्रमाणात खासगी बँका, पतसंस्था व सोनारांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मोहोळ पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दहापेक्षा जास्त आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. तर इतर साथीदार फरार आहेत.

हे सोने दिल्ली उत्तर प्रदेश येथील हापुर मधून येत असुन त्यावर सर्व प्रकारच्या हॉलमार्कचे शिक्के आहेत. त्या सोन्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बँकांची पतसंस्थांची व सोनाराची फसवणूक करण्यात आली आहे. असे सोने बँकांमध्ये ठेवून पतसंस्था मध्ये ठेवून व त्यावर ती मोठ्या प्रमाणात पैसे उचलून त्याचा वापर स्वतःच्या फायद्याकरता करून बँकांची म्हणजेच शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. सदर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोलीस नाईक शरद डावरे व प्रवीण साठे यांनी केला आहे. प्रवीण साठे हे करमाळा येथे कर्तव्य बजावत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रसिद्धीस आले होते.

सदरच्या प्रकरणांमध्ये मोहोळ पोलिस ठाण्यात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. याचा तपास करत असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. यामध्ये संशयित आरोपी म्हणून पप्पू तांबोळी, इस्माईल मणियार वय 21 राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, मनोज मधुकर बनगर वय 24 राहणार पिसेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली, बळीराम महादेव यादव वय 55 वर्ष राहणार भुताष्टे तालुका माढा, जिल्हा सोलापूर, बबलू इसाक पठाण, बबलू उर्फ सद्दाम तांबोळी, नवनाथ सरगर राहणार सुभाषनगर, कोल्हापूर, योगेश गोरेलाल शर्मा वय 40 राहणार सराफ कट्टा, सांगली व इतर साथीदार अशा प्रकारच्या या संशयित आरोपींवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे व पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण साठी हे करीत आहेत

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE