करमाळासोलापूर जिल्हा

कृषी उत्पन्न बाजार समीती सचिव पदाच्या निवडीत नवा ट्विस्ट

करमाळा समाचार 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेला सचिव निवडीच्या ठरावाला व सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे . यामुळे सभापती सह बागल गटाला जबर धक्का बसला असून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे .

करमाळा बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे यांनी सेवानिवृत्त झालेनंतर सेवा ज्येष्ठता व कायद्यातील तरतुदी तुसार विठ्ठल क्षीरसागर यांचेकडे पदभार सोपविला . परंतु बाजार समितीचे सभापती व बागल गटाला हा पदभार क्षीरसागर यांचेऐवजी पाटणे यांचेकडे सोपवायचा होता . त्यामुळे त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली व २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांचे उपस्थितीत बैठक पार पडली . या बैठकीत समसमान मते पडून सभापतींच्या निर्णायक मताच्या आधारे पाटणेंचा ठराव मंजुर केला . मात्र या बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी कायद्यातील तरतुदी , नियम, अधिनियम, कर्मचारी सेवानियम आदींबाबत सर्व सदस्यांना अवगत करून तशी नोंद इतिवृत्तामधे केली . दरम्यान क्षीरसागर यांनी सभापतींच्या पूर्वीच्या आदेशा विरोधात अपील दाखल केले असल्याने सदरची बाब न्यायप्रविष्ठ व प्रलंबित असल्याचे सांगत व सदरचा ठराव माझी सेवाजेष्ठता व पात्रतेवर अन्यायकारक असून चार्ज देणार नसलेची भुमिका घेतली . व तातडीने ठरावाच्या विरोधात देखील दुसरे अपील दाखल केले . यावर ८ जुलै रोजी पणन संचालकांसमोर सुनावणी झाली . यात क्षीरसागर यांनी मागितलेला स्थगिती अर्ज पणन संचालक सतीश सोनी यांनी मंजूर करत सभापतींचा आदेश व बाजार समितीच्या ठरावाच्या अंमल बजावणीस स्थगिती दिली .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE