करमाळासोलापूर जिल्हा

माजी आमदार पाटील यांची तातडीची पत्रकार परिषद ; होऊ शकते अनेक विषयांवर चर्चा – नेमके विषय कोणते ?

करमाळा समाचार 

माजी आमदार नारायण पाटील यांनी अचानक पणे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. नेमकी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर पंचायत समिती सभापती व बाजार समितीत सुरू असलेल्या घडामोडीशिवाय दहिगाव उपसा सिंचनसह अनेक खुलासे होण्याची शक्यता असल्याने ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव पदावरून सुरू असलेला वाद म्हणून संचालकाच्या कोर्टात आहे. तर सभापतीपदी असलेले शिवाजी बंडगर हे पाटील गटातून बाजूला होऊन बागल यांना जाऊन मिळाले होते. त्यानंतर त्यांना सभापतीपद मिळाले. पण आज तब्बल दोन वर्षाचा कार्यकाल लोटला तरी सचिव पद असेल किंवा इतर कारणांमुळे बंडगर यांची दमछाक होताना दिसत आहे. त्याप्रकरणात माजी आमदार पाटील यांची भूमिका अजुनही गुलदस्त्यात आहे.

तर पंचायत समिती निवडणुकीमध्ये सभापतिपद तब्बल 9 सदस्य पाटील गटाकडे असतानाही शिंदे गटाने सभापती पदावर दावा करीत आव्हान दिले होते. पण तो दावा फोल ठरला त्याबाबतही या पत्रकार परिषदेत भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येऊ घातलेल्या पंचायत समितीत पुन्हा एकदा पाटील गटाची सत्ता येण्यासाठी कोणती समीकरणे असतील यावरही चर्चा होऊ शकते.

तसेच विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेत माजी आमदार नारायण पाटील यांनी एकही रुपयाचा निधी आणला नसल्याचा दावा केला आहे. त्या दाव्याला प्रत्युत्तर नारायण पाटील काय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खरंच पाटील यांनी दहिगाव मध्ये आपले योगदान दिले नाही का ? का विरोधक कांगावा करत आहेत याचा खुलासा आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE