करमाळासोलापूर जिल्हा

दुख:द – अर्बन बॅंकेच्या किरणची झुंज अपयशी ठरली ; रात्री निधन

करमाळा समाचार 

करमाळा अर्बन बँकेचे कर्मचारी किरण बाबासाहेब बडदे (वय 40) यांची आजारा सोबतची झुंज अपयशी ठरली आहे. त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले आहे. किरण बरिदे हे अतिशय मनमिळावू व कष्टाळू कर्मचारी म्हणून करमाळा बॅंकेत ओळखले जायचे. कायम हसतमुख असलेले बरीदे आज आज अचानक गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

भारदस्त अशी शरीरयष्टी असलेले किरण 2004 साली करमाळा अर्बन बँक येथे शिपाई म्हणून कार्यरत झाले. बँकेच्या कामात पडेल ते काम योग्य रीतीने करीत असल्याने अधिकाऱ्यांची तसेच त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची त्यांचे सलोख्याचे संबंध होते. प्रत्येकाला व्यवस्थित मार्गदर्शनही करत होते त्यामुळे अनेकांसोबत त्यांची जवळीक वाढली होती.

मागील काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा त्रास होऊ लागला होता. त्यावेळी त्यांना करमाळा येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करून त्यानंतर सोलापूर येथे उपचार सुरू होते. त्याच्यातून विविध आधार जडत गेले व त्यातून सावरत होते पण काल पुन्हा दवाखान्यातून तपासणी करून आल्यानंतर रात्री उशिरा त्रास होऊ लागला व त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE