माजी आमदार नारायण पाटलांचे आ. शिंदे यांना खुले आव्हान
करमाळा समाचार
सुप्रमा मंजूर करून फक्त श्रेय लागणारे आमदारांनी निधी उपलब्ध करून आणण्या आधीच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ते करत असताना नाहक आमची बदनामी करून सर्व आपणच दिल्याचं दाखवत आहेत. पण वस्तुस्थिती तशी नसून सुप्रमा मंजूर झाल्यानंतर २०१४ ते २०१९ जवळपास ९० कोटी रुपयांचा निधी आणण्याचे काम करून दहिगाव उपसा सिंचन योजना पूर्ण करून घेतले आहे.


ज्या पद्धतीने आरोप झाल्यानंतर समोर येऊन आपण उत्तर द्यायला बांधील आहोत. त्याच पद्धतीने संजय मामा शिंदे यांनी त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचललेली प्रकरणे आहेत. तर ते कशा पद्धतीने मिटवले हे त्यांनी जाहीर करावे असे खुले आव्हान माजी आमदार नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांनी याचा खुलासा केला तर उघडपणे आपण त्यांची पाठ थोपटतो पण तसे न करता ते फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत.