करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

शिक्षक आत्महत्या प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणात दोन जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम गोविंद वारे या शिक्षकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर खिशात मिळून आलेल्या चिट्ठी वरून दोन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश यादव व हनुमंत बागल असे दोन संशयाचा संशयितांची नावे आहेत. सदरचा प्रकार शहरात गणेश नगर परिसरात घडला आहे.

बळीराम वारे हे विठाबाई माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी किचनमध्ये त्यांचे मृत शरीर स्लॅबच्या टोकाला साडीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळून आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले.त्यावेळी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळाली त्या मध्ये शेतीच्या व्यवहारातही १४ लाखाचा व्यवहार झाल्यानंतरही जमिनीचा ताबा दिला नाही. तसेच आपण त्या ठिकाणी पाऊल ठेवले तर धमकी मिळत होती. त्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. यावरून वारे यांच्या मुलाने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.

ads

Karmala_news

Two charged in teacher suicide case

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE