करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनीची वाटचाल पन्नाशीकडे ; शेतकऱ्यात समाधान

करमाळा समाचार -संजय साखरे


पुणे नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात वरील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग येत असून चार ते पाच दिवसात उजनी धरण 50 टक्के चा टप्पा पार करेल.
आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड येथून सुमारे २२०००क्यूसेक या वेगाने पाणी येत असून धरणात सध्या पाण्याची टक्केवारी ३६.०९ इतकी झाली आहे.

अवर्षणग्रस्त सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणाचा फार मोठा आधार आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्राला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा होता. त्यामध्येच सोलापूर साठी पाणी सोडल्यामुळे तो आणखीन कमी झाला होता .पण अखेर ओढ दिलेला पाऊस बरसला आणि धरणात दिलासादायक पाणीसाठा झाला.

सध्या उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ८२ टीएमसी वर पोहोचला असून उपयुक्त पाणीसाठा १९ टक्क्याहून अधिक झाला आहे. दरम्यान उजनी वर अवलंबून असणाऱ्या खालील क्षेत्राला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत असून दहिगाव उपसा सिंचन द्वारे लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE