करमाळासोलापूर जिल्हा

जिंतीच्या लाईनमनचे कौतुकास्पद काम ; गावकाऱ्यांकडुन कौतुकाचा वर्षाव

जिंती – दिलीप दंगाणे 

जिंती सब स्टेशन अंतर्गत असलेला टाकळी फिटर वरील मेन लाईनला वेलींनी आणि झाडांनी गुंफण केल्यामुळे लाईन सतत जात होती. यालाईन वर शेतीपंपाची लाईट तसेच सिंगल फेज डीपी आहेत. रानमाळा मध्ये अंधाराचे सावट असल्यामुळे जिंती गावचे लाईनमन विजय जोशी ( काका )यांनी स्वतःच्या जीवाची कसलीच परवा न करता झाडाझुडपातून मार्ग काढत लाईन मोकळी केली. व टाकळी फिटर व्यवस्थित सुरळीत चालू केला.

त्यामुळे जिंती व पंचक्रोशी लोकांनी लाईनमन विजय जोशी (काका) यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. त्यांच्या जोडीला जिंती गावचे ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र वारगड, धर्मराज उर्फ बापू ओंबासे इत्यादी विजय जोशी यांच्या कामास मदत केली.

तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ सवितादेवी राजेभोसले यांनी जेसीपी मागवला व अडचणीच्या ठिकाणचा मार्ग मोकळा करण्यास मदत केली. त्यामुळे जिंती सब स्टेशन अंतर्गत असलेला टाकळी फिटर सुरळीत चालू झाला.

तालुक्यातील इतर लाईन मेन जिंती च्या लाईन मेन विजय जोशी काका यांचा आदर्श घ्यावा – (राजेंद्र बाळासाहेब भोसले प्रगतशील बागायतदार जिंती)

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE