करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही ; लोक भडकले त्यांना अपेक्षीत नावाची चौकशी

करमाळा समाचार –

आज नुकतीच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली. गुन्हा अद्याप दाखल झाला नसल्याने संबंधित अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. पण बातमी लागल्यानंतर बऱ्याच लोकांकडून नेमकी कोणावर कारवाई झाली म्हणून विचारणा केली जाऊ लागली. उलट त्यांना अपेक्षित नाव न पुढे आल्याने लोकांचा हिरमोड नक्की झाला. परंतु लोकांना अपेक्षित नावे कधीपर्यंत लोकांना लुटणार आहेत असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

भूमीअभिलेख कार्यालयात लाच घेतल्या शिवाय कामच होत नाही. सहा सहा महिने नोंदी पडून आहेत. शिपाई पासून वरिष्ठ अधिकारी पर्यंत ठराविक रेटच ठरले आहेत. संबधीत अधिकारी कायमचेच सेवेत घेऊ नये हीच सर्वसामान्य लोकांची अपेक्षा – विठ्ठल शेळके, वांगी.

अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियामध्ये फिरू लागले आहेत. करमाळा समाचार मध्ये बातमी प्रसिद्ध होताच थोड्याच वेळात आम्हाला या संदर्भात फोन येऊ लागले व संबंधित अधिकाऱ्याचे नाव जाहीर करा म्हणून सांगू लागले. परंतु अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्याशिवाय त्या अधिकाऱ्याचे नाव उघड केले नसल्याने सदरचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते.

यामध्ये लोकांना वेगळ्याच नावाची अपेक्षा असल्याने ते नेमके अधिकारी कोण ? आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे अशा लोकांनी वेळेत सावध होऊन पैसे खाणे बंद करावे व लोकांची कामे वेळेत करावीत अन्यथा पुढचा नंबर तुमचा असेल अशी एक प्रकारे विनंती संबंधित अधिकाऱ्यांना असेल. सदर प्रकरणात पुरुष अधिकारी आहे. खंडु मारुती रेंगडे असे नाव आहे. 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE