करमाळ्याची पुजा पूरग्रस्तांच्या मदतीला ; दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे वाटप
करमाळा समाचार
कोकणात महापुराने जनजीवन विस्कळीत केले आहे. या नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण कोकण उध्वस्त केला आहे. या दुःखातून आपल्या कोकणवासीयांना बाहेर काढण्यासाठी त्यांना अल्पशी मदत करण्यासाठी करमाळ्याची कन्या कु.पुजा संभाजी झोळे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवती काँग्रेस व त्यांची टीम त्यांच्या पुढाकारातून अडचणीत असलेल्या कोकणवासीयांसाठी मदत करण्याचे काम सुरू केले.

गेले पंधरा दिवसा पासून हे काम चालू आहे.या महापुरातून कोकणाचे फार नुकसान झाले आहे. यांना यातून सावरण्यासाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नधान्य कीट,औषध महिलांसाठी साड्या, चादरी, लहान मुलांसाठी कपडे व शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देण्यात आले आहे. पुन्हा संसार उभा करण्यासाठी भांडे देण्यात आले आहेत. ही मदत कोकणातील चिपळूण,महाड तसेच पुणे जिल्ह्यातील भोर येथे पोहच करण्यात आली.

पुजाने हे काम आपली सामाजिक जबाबदारी म्हणून केले आहे. आणि या बिकट परिस्थिती मध्ये आम्ही त्यांच्यासोबत आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत अशी भावना व्यक्त केली.
या मदतीसाठी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि शिवाजीनगर पुणे ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने मदत करण्यासाठी समोर आलेले आहेत.