करमाळासोलापूर जिल्हा

वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन

करमाळा समाचार – संजय साखरे 

तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीने खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत चालू करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

विजउप अभियंता करमाळा, यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेल्या आठ दिवसापासून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला आहे. या वर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकरी उजनीतील पाण्यावरच अवलंबून आहे .उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. मार्च 2021 मध्ये शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरलेले आहेत. त्यानंतर अद्याप शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले नाही. तरकारी माला ची अवस्था आजच्या परिस्थितीला अतिशय बिकट झाली असून तो माल तोडायला सुद्धा शेतकऱ्यांना परवडणे सा झाला आहे. याशिवाय या भागातील शेतकऱ्यांनी ज्या कारखान्यांना ऊस घातला आहे त्या कारखान्यांनी अद्याप एफ. आर .पी ची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. आताच्या घडीला शेतकरी ऊस पिकांना रासायनिक खताची मात्रा देत आहे त्यासाठी उसाला पाण्याची नितांत आवश्यकता असते. अन्यथा एकरी ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत चालू करावा अन्यथा वीज वितरण कंपनी च्या विरोधात शेतकऱ्यांचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE