मायबाप सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये – सवितादेवी राजेभोसले
करमाळा समाचार – अमोल जांभळे
गेल्या दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचे सावट आहे.सतत लॉक डाऊन केले जात आहे अजून आपला तालुका लॉकडाउनच्या छायेत आहे. कडक निर्बंध लावले जात आहेत. आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकलेल्या मलाला कवडीमोल किंमत मिळत असून भाजीपाला तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत एफआरपीच्या रक्कमा दिलेल्या नाहीत. दुसरीकडे पाहिले असता रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत दुधापेक्षा पाणी महाग पशुखाद्याचे दर वाढत चालले आहेत.

निसर्ग साथ देत नाही हवामान बदलामुळे शेती पिकांवर ती महागडी औषधे फवारणीसाठी वापरावी लागतात.
शेतकऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उद्भभवत आहे.
धरण उशाला अन् कोरड घशाला अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली असताना महावितरण शेती पंपाची लाईट बंद करून शेतकऱ्यांना लाईट बिलाचा शॉक दिला आहे.
तालुक्यात कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही शेती पिकाला पाण्याची अत्यंत गरज असताना कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांची बाजू न पाहता अचानक शेतीपंपाची लाईट बंद केली आहे. ते आम्ही कदापिही शेतकरी सहन करणार नाही मागील दोन दिवस जनावरांसाठी थ्री फेज लाईट दिली जात होती ती पण बंद केलेली आहे मायबाप सरकाला हाक देवून मुक्या जनावरांसाठी दोन तास लाईट सोडण्याची विनंती करून चालू केलेली आहे.
गेल्या चार महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी बिले भरलेली असून आज तागायत शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.आता सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशारा जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांनी दिला आहे.
