करमाळा तालुक्यात लंपीचा दुसरा बळी , अजुन एक गाय दगावली

करमाळा समाचार -संजय साखरे


करमाळा तालुक्यात लंपी रोगाने मृत्यू पावणाऱ्या जनावरांचे सत्र सुरू असून काल रात्री उशिरा सावडी येथील पशुपालक शेतकरी हनुमंत शंभू देव जाधव यांच्या गावरान गायीचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे.

कालच राजुरी येथील शेतकरी निलेश दुरंदे यांच्या दीड लाख रुपये किमतीच्या जर्सी गाईचा मृत्यू झाल्यानंतर आज तालुक्यात लंपिने दुसरा बळी घेतला आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराट उडाली असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन जनावरांवर उपचार करावेत अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दूध दरामध्ये झालेली घसरण यामुळे तालुक्यातील पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. परंतु आता दुधाचे भाव वाढले असून दुधाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे झाले आहेत. यातच लंपी सारख्या रोगाने थैमान घातले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून सदर गाय आजारी होती. त्यांनी कोर्टी येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश झोळ यांच्याशी संपर्क केला .त्यांनी तातडीने गाईवर उपचार केले. गेल्या दहा दिवसापासून तिच्यावर उपचार चालू होते .परंतु काल शेवटी गायीचा मृत्यू झाला.

गाई गेल्या पंधरा दिवसापासून आजारी होती. मी कोर्टी येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश झोळ यांच्याशी संपर्क केला .त्यांनी तातडीने गायीवर उपचार चालू केले .परंतु शेवटी गायीचा मृत्यू झाला.
हनुमंत जाधव,पशुपालक शेतकरी ,सावडी

सदर गाईवर गेल्या दहा दिवसापासून उपचार चालू होते. या कामी पशुधन विकास अधिकारी डॉ. राऊत, विस्तार अधिकारी डॉ. शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. यादव, जिल्हा उपायुक्त डॉ. सोनवणे, सहाय्यक आयुक्त डॉ. गुळमिरे आणि पशुधन अधिकारी डॉ. मांजरे यांनी या ठिकाणी भेटी देऊन गाईवर उपचार केला. परंतु शेवटी गायीचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता कोर्टी परिसरात लंपी रोगाने गंभीर आजारी असणाऱ्या जनावरांचे प्रमाण आटोक्यात आले आहे. आजारी जनावरांवर उपचार चालू आहेत.
डॉ .मंगेश झोळ,
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, कोर्टी

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE