करमाळासोलापूर जिल्हा

तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करमाळ्यात डॉक्टरासोबत बैठक

प्रतिनिधी | करमाळा


कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील डॉक्टरांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार समीर माने यांच्यासह इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये लहान मुलांसाठी २० टक्के बेड राखीव ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय नवीन कोविड हॉस्पिटलसाठी प्रस्ताव दाखल करावेत त्यामध्ये प्रशासन संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करेल असे आश्वासन यावेळी श्रीमती कदम यांनी दिले. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टरांच्या वतीने ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याची मागणी करण्यात आली. तर ऑक्सिजन रेट परवडत नसुन रेट वाढवण्याची मुभा डॉक्टरांना द्यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी तहसिलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, गटविकास अधिकारी राजाभाऊ भोंग, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक अमोल डुकरे, बांधकाम विभागाचे अधिकारी श्री उबाळे यासह करमाळा शहरातील व तालुक्यातील डॉक्टर उपस्थित होते.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE