E-Paperपंढरपूरसोलापूर जिल्हा

पंढरपुरात काट्याची टक्कर लीड आला दोनशेच्या घरात

करमाळा समाचार – पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपुरात सध्या काट्याची टक्कर पाहायला मिळत असून आतापर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये सहाव्या फेरीचे कल आपल्या हाती लागले आहेत. त्यामध्ये समाधान आवताडे यांना तीन हजार 159 तर भगीरथ भालके यांना दोन हजार 695 इतकी मते मिळाली आहेत. सहाव्या फेरीत समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीत 464 थोडीशी आघाडी घेतलेले दिसत आहे. तर एकुण मध्ये भालके 194 ने पुढे आहेत.

दरम्यान आतापर्यंत प्रत्येक फेरीमध्ये काट्याची टक्कर दोन्ही बाजूने बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर घासून लढत होत असल्याने दोन्ही बाजूने धाकधूक वाढली आहे. समाधान आवताडे यांना सहाव्या फेरीअखेर 17211 तर भगीरथ भालके यांना 17412 मते मिळाली आहेत.

सहाव्या प्रिया खेळ मोठा लीड तोडत समाधान आवताडे पुढे येत असून भगीरथ भालके यांच्याकडे केवळ 194 मतांची लिड असल्याचे दिसून येत आहे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE