E-Paperताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

शिवसेना आमदारांच्या कडुन शेतकऱ्यांचे घामाचे पैसे देण्यास टाळाटाळ ; मुख्यमंत्री ठाकरे यांनी लक्ष घालण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी

करमाळा समाचार 

शिवसेना(shivasena) आमदार तानाजी सावंत (tanaji sawant) यांच्याकडून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देण्यास होत असलेली टाळाटाळ व शेतकऱ्यांच्या घामाचा मोबदला मिळणे बाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे(mahesh chivate) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakarey) यांना पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे. तर शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या कडून होत असलेल्या दडपशाहीचा विरोध या पत्रातुन केला आहे.

शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामध्ये ते म्हणाले की, करमाळा तालुक्यात आमदार तानाजी सावंत यांचे भैरवनाथ शुगर (bhairavanath shugar) कारखाना आहे. या कारखान्यात 2018-19 या वर्षामध्ये ऊसाला 22 रुपये भाव देतो म्हणून त्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला. पहिल्या दोन महिन्यात आलेल्या गाळपास शेतकऱ्यांना बावीसशे रुपये दराने भाव दिला मात्र नंतर शेतकऱ्यांच्या अठराशे रुपये दराने भाव दिला.

यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर 136 रुपये उर्वरित पेमेंट काढले. आता जवळपास शेतकऱ्यांची एक लाख तीस हजार मेट्रिक टनाचे प्रतिटन 266 रुपये प्रमाणे जवळपास चार कोटी 50 लाख रुपयांची देणी शेतकऱ्यांचे कारखान्यांनी थकवले आहेत. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आज शेतकरी प्रचंड अडचणीत असून शेतकऱ्याला पैशाची प्रचंड गरज आहे. यामुळे कारखान्यासमोर वारंवार शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सुद्धा पैसे दिले जात नाही. या प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत शेतकरी संघटना यांनी वारंवार आंदोलने केली आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करून परत पाठवले जाते.

तानाजी सावंत यांच्या दडपशाहीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. शिवाय हा कारखाना सुरू करताना तानाजी सावंत यांनी जवळपास सात हजार शेतकऱ्यांकडून 20 हजार रुपयांचे शेअर्स पंधरा वर्षांपूर्वी घेतला होता. त्या शेअरची जवळपास चौदा कोटी रुपये रक्कम परत मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना शेअर्सची रक्कम परत दिली जात नाही. गेली दहा-बारा वर्षांपासून शेतकऱ्यांचे जवळपास चौदा कोटी रुपये तानाजी सावंत यांनी आणून ठेवले आहे. या रकमेवर व्याज दिले जात नाही लाभांश दिला जात नाही. आज संपूर्णपणे निसर्गाच्या दृष्टी चक्रामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना आमदार तानाजी सावंत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देत नाहीत अशा या शिवसेना आमदारावर आपण तात्काळ कारवाई करावी व याचा खुलासा त्यांना मागावा अशी पत्र पाठवले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE