करमाळासोलापूर जिल्हा

दुपारी दिड पर्यत चुरशीने पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान ; सायंकाळी साडे पर्यत चालु राहणार मतदान

करमाळा समाचार 


51 पैकी 49 ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुका साठी सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. अतिशय उत्साही वातावरणात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दिड वाजेपर्यंत निम्म्याहून अधिक मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यत 52 टक्के मतदार झाले आहे. १९हजार ३२३ महिला मतदार तर २२हजार ३९५ पुरुष असे तब्बल ४१ हजार ७१८ मतदारांचे मतदान पुर्ण झाले आहे.

तालुक्यात होत असलेल्या ५१ ग्रामपंचायती पैकी सालसे व जेऊरवाडीसह आकरा प्रभागासह ४६ सदस्य बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतीसाठी १५९ मतदान केंद्रावरुन आज सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. यासाठी ७९ हजार ९६२ एकूण मतदार मतदान करणार आहेत.

सकाळी साडे नऊ पर्यत १० हजार ४६२ नंतर साडे आकरा पर्यत २५हजार ३७९ तर दिड वाजे पर्यत ४१७१८ मतदारांनी मतदान केले आहे. त्यांना अजुनही निम्मा कालावधी बाकी असला तरी चुरशीने मतदान सुरु आहे असे दिसुन येत आहे. आतापर्यत ५२. १७ मतदान पुर्ण झाले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE