करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सतर्क पणे राबवावी
प्रतिनिधी – संजय साखरे
कोरोना च्या वाढत्या काळात लोकांना या विषयी माहिती देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा सतर्कपणे राबवावी असे आव्हान करमाळा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉ.अमोल दुरं दे यांनी केले आहे . काल अथर्व मंगल कार्यालय, करमाळा येथे सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांची कार्यशाळा पोलीस विभागामार्फत घेण्यात आली. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

राजुरी ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे जिने दोन वर्षांपासून ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभाविपणे राबवित आहे, ही यंत्रणा सुरु करण्यासाठी राजुरीचे सुपुत्र पी. आय नारायण सारंगकर यांनी मोलाचे सहकार्य केले.या यंत्रनेमुळे विविध विकासाच्या शासकीय योजना लोकांपर्यंत सहज पोहचवता येत आहेत.

तसेच चोरी, दरोडा व कोणतीही आपत्ती आल्यास या यंत्रनेमार्फत लोकांना जागृत करता येते. या कोरोनाच्या काळात तर कोरोनाविषयक कोणतीही माहिती एका वेळेस गावातील सर्वं लोकांना देता येत असल्यामुळे काही प्रमाणात गावातील कोरोनाचे प्रमाण कमी होण्याससुद्धा या यंत्रनेचा वाटा आहे,त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा यंत्रणा लवकर सुरु करून गावात होणाऱ्या चोरी, दरोडा थांबवता येऊ शकतात अशी माहिती राजुरीचे लोकनियुक्त सरपंच, करमाळा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली.