करमाळासोलापूर जिल्हा

भैरवनाथ शुगर कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु ; बारामतीतुन नोंद होऊन करमाळ्यात गुन्हा दाखल

करमाळा समाचार

भैरवनाथ साखर कारखाना येथे हंगामी नोकरी करतो. दिनांक 15/8/21 रोजी 07/40 वाचे सुमारस आम्ही सर्वजण आमचे घरी हवालदार वस्ती येथे असताना तुषार भगवान चव्हाण (वय ३२)  हा गावात दुकानात जावून किराणा सामान घेवून येतो असे सांगुन त्याची मोटार सायकल होन्डा ड्रिम त्याचा आरटीओ नंबर एम.एच.45 ए.बी.3609 यावरुन निघून गेला.

तुषार हा सहया्रदी दुध डेअरीच्या समोरील डांबरी रोडवर निपचीत पडला होता. करमाळ्यातील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी तुषार यास पुढील उपचाराकरीता बारामती येथील गिरीराज हस्पीटल येथे घेवून जाणेस सांगितले. त्यानंतर तुषार यास गिरीराज हॉस्पीटल बारामती येथे उपचाराकरीता दिनांक 15/08/2021 रोजी रात्री 11/30 वाचे सुमारास दाखल केले.

दिनांक 16/08/2021 रोजी दुपारी 03/00 वाचे सुमारास वैदयकीय अधिकारी गिरीराज हॉस्पीटल बारामती यांनी कळविले की, तुषार भगवान चव्हाण वय 32 वर्षे हा उपचारादरम्यान मयत झालेचे घोषीत केले. त्यानंतर रात्री 09/00 वाचे सुमारास भाऊ तुषार भगवान चव्हाण वय 32 वर्षे याचेवर गांवी कोर्टी येथे अंत्यसंस्कार केले.

त्यानंतर मयताचे सर्व विधी केल्यावर आम्ही व पोलीसांनी त्याचे अपघाताबाबत सदर ठिकाणी राहणारे लोकांकडे चौकशी केली असता असे समजले की, अज्ञात वाहनाचा धडक दिल्याचा आवाज आला होता त्यानंतर थोडयावेळाने तेथे लोक जमा झाले होते. व त्याचेत चर्चा होती की, एका कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याचा आवाज आला होता ती धडक तुषार चव्हाण याचे मोटार सायकलला दिली असावी. अशी लोकांमध्ये चर्चा होती.

सदरबाबत बारामती पो.स्टे.वरून कागदपत्र टपालाने करमाळा पो.स्टे.ला आल्यावर नोंद झाली आहे. याप्रकरणी शरद भगवान चव्हाण वय 38 वर्षे धंदा मजूरी रा. हवालदार वस्ती, कोर्टी ता.करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE