केत्तुर वि. का .से .स सोसायटीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करा-मा चेअरमन शिवाजी राव पाटील यांची मागणी
प्रतिनिधी – संजय साखरे
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व केत्तुर नंबर एक व दोन अशी दोन गावे समाविष्ट असणाऱ्या केतुर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम स्थगित करा अशा आशयाची मागणी सोसायटीचे माजी चेअरमन श्री शिवाजीराव साहेबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की ,केत्तुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक कार्यालयाकडून गुपचूप गुप्त पद्धतीने चालू असून गावातील जमीनदार सभासदांची नावे मतदार यादीतून वगळून बाहेरच्या गावातील लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
याशिवाय निवडणूक प्रक्रिया पंचनाम्यावर ग्रामसेवकाची बोगस सही करण्यात आली आहे. त्यामुळे सदर निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलून खरे सभासद असणाऱ्या सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी व नंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मंत्रिमहोदयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनाच्या प्रती त्यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर व माननीय पालकमंत्री सोलापूर यांना पाठविल्या आहेत.
