करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपा व आगार अधिकारी वाद

करमाळा समाचार 

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाला करमाळा तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आज सर्व फेऱ्या रद्द झाल्या असून सर्व कर्मचारी हे काम बंद आंदोलन पुकारून बसस्थानकाच्या आवारात थांबलेले आहेत. यावेळी पाठिंबा देण्यात आलेल्या भाजपा पदाधिकार्‍यांना याठिकाणी वेगळाच अनुभव पाहायला मिळाला.

भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे व इतर पदाधिकारी हे संबंधित कामगारांना पाठिंबा देऊन माघारी परतत असताना काही कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुख व इतरांकडून आमच्यावर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी केल्या. परंतु समोर येऊन बोलण्यासाठी ते तयार नव्हते त्यांची अडचण लक्षात घेऊन भाजपा तालुका अध्यक्ष हे आगार प्रमुख यांना विनंती करण्यासाठी त्यांच्या कक्षात निघाले .

त्याठिकाणी पोहोचल्यानंतर संबंधित केबिनमध्ये आगार प्रमुख यासह इतर कर्मचारी होते. त्यामध्ये सहाय्यक पंकज जाधव हे ही होते. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना बाबत चिवटे यांनी विनंती केल्यानंतर आगार प्रमुख अश्विनी किरण किरगत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले व आम्ही कसलाही दबाव आणत नसल्याचे सांगितले. परंतु कर्मचाऱ्यांना दबाव येत असल्याचे आधीच कल्पना असल्याने त्याने शेवटी हे आपल्या मतावर ठाम होते. यातूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यात मध्ये सहाय्यक पंकज जाधव यांनी उडी घेतली. यावेळी हा वाद अधिकच वाढला.

दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असताना हा आमच्या खाजगी विषय नसून प्रवाशांसह कामगारांचाही विषय असल्याचे चिवटे यांनी सांगितले. परंतु यावेळी आगारप्रमुख यांनी हा विषय आमचा असून आमच्या पद्धतीने आम्ही निस्तरु तुम्ही या मधे पडू नका असे तालुकाध्यक्ष चिवटे यांना म्हणाल्या. त्यावरून भाजप पदाधिकारी यांनी सदरचा विषय हा कोणा एका खाजगी विषय नसून सार्वजनिक बाबींचा विषय असून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली.

किरकत यांच्यासोबत चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले पंकज जाधव यांनी मध्येच बोलत वाद सर्व आपल्या बाजूने ओढून घेतला. यावेळी पंकज जाधव हे नेमके एसटी कर्मचारी आहेत का ते तिऱ्हाईत व्यक्ती हे समजून येण्या पलीकडचे होते. कारण पंकज जाधव हे संबंधित टेबल वर जरी बसले असले तरी त्यांच्या अंगावर आगाराचा कोणताही ड्रेस नव्हता शिवाय त्यांचे हुद्दा असलेली पट्टी ही त्यांच्या कडे नव्हती. त्यामुळे नेमके ते कर्मचारी आहेत का दुसरे कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच मध्ये बोलताना त्यांनी आगार प्रमुखांचे सुरक्षा रक्षक असल्याप्रमाणे वाद वाढवण्यास सुरुवात केली. आगार प्रमुखाना मोठ्या आवाजात बोलु नये हे सांगत असताना आपण एका विशिष्ट ठिकाणी अधिकारी असल्याचे जाधव विसरले असावे त्यामुळे गल्लीबोळात भांडण करताना किवा सोडवताना मध्यस्थी करतो त्या पद्धतीने जाधव यांनी इंट्री केली. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला. त्यामुळे संबंधित विभागातील लोक नियमावली पाळतात का नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE