उद्या रविवारी कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री भरणे व आमदार संजयमामासह मान्यवर केत्तुर मध्ये
करमाळा समाचार – संजय साखरे
करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज या विद्यालयात बारामतीतील कोकरे परिवार व केत्तुर मधील पाटील परिवार यांनी निर्मला विनायक कोकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे असणार असून , प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ऍड बि .डी कोकरे, युवराज भोसले, जयसिंगराव देशमुख गणेश करे पाटील, सुभाष गुळवे, आप्पासाहेब झांजुरणे, कन्हैयालाल देवी, नवनाथ झोळ, तानाजी झोळ, सविता देवी राजे भोसले, सूर्यकांत पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रामराव पाटील, पांडुरंग कोकरे, अशोक पाटील व शिवाजी पाटील यांनी केले आहे.