उगाच रोहित पवारांना त्रास होऊ नये म्हणुन … ; उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले
करमाळा समाचार
जामखेड येथे शनिवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत बोलत असताना पवार बोलत होते.
यावेळी उपस्थित लोकांमधून एक जण उठून वीज नाही, शेतीमालाला भाव नाही अशीच सारखी प्रश्नाची सरबत्ती करत होता.
त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर चांगले संतापून म्हणाले, असा प्रकार बारामतीत झाला असता तर याला सांगितले असते. जाऊदे याचा त्रास रोहित पवार ला होईल म्हणून शांत बसतो अशा शब्दात खडे बोल सुनावले.
आपल्या सडेतोड बेधडक धडक बोलण्याच्या विशिष्ट स्टाइलमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जामखेडकरांना भरसभेत आला.
अजित पवार यांनी संताप व्यक्त केल्यानंतर….
जामखेड येथे शनिवारी भूमिपूजन कार्यक्रमानंतर बाजार तळावर सभा झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. पवार यांचे भाषण सुरू असताना उपस्थित जनसमुदायाला मधून एक जण उठून उभा राहीला. त्याला सुरुवातीला पवार यांनी दुर्लक्ष केले. पण संतापून बोलल्या नंतर पुन्हा मात्र कोण उठले नाही. सर्व काही शांत झाले.